Tuesday, June 25, 2024 12:49:57 PM

900 Dams in Krishna Valley Safe
कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित

मोसमी पावसाचे आगमन यावर्षी लवकर झाले आहे.

कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित 
Pune Dam

पुणे : मोसमी पावसाचे आगमन यावर्षी लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळातील सर्व प्रकारच्या छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा सुमारे ९०० धरणांची सुरक्षितता तपासली आहे. त्यानुसार या धरणांची स्थिती मजबूत आहे. केवळ किरकोळ दुरुस्तीसह विविध उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. 

धरणांची तपासणी कशी होते?

जलसंपदाकडील धरण सुरक्षा संस्था नावाच्या विभागाकडे धरणांची यादी असते. त्यानुसार दरवर्षी ते ठराविक धरणांची तपासणी करतात. तपासणी करताना प्रामुख्याने धरणातील गळती मोजणे, सांडवा, धरणाचे वरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत किंवा कसे, देखभाल-दुरुस्ती आणि याबाबत केलेल्या नोंदीनुसार कामे झाली आहेत किंवा कसे, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा अशा विविध घटकांची तपासणी होते.
 

महत्त्वाचे मुद्दे - 

कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणे सुरक्षित 
जलसंपदा विभागाकडून तपासणी
 

                    

सम्बन्धित सामग्री